नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून सेवानिवृत्त न्यायमूर्ती जगदिशसिंह खेहर, कुमुदिनी रजनिकांत लाखिया, लक्ष्मीनारायण सुब्रम्हण्यम यांच्यासह गायिका शारदा सिन्हा, सुजुकीचे माजी सीईओ ओसामू सुजुकी, एम. टी. वासुदेवन नायर यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाला तर अर्थशास्त्रज्ञ विवेक देबरॉय, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, गायक पंकज उधास, माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, साध्वी ऋतुंभरा, शेखर कपूर यांच्यास एकूण १९ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला तर अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली, होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे, पर्यावरण कार्यकर्ते चैत्राम पवार, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासह ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
दुव्वुर नागेश्वर रेड्डी, न्या. जगदीशसिंह खेहर, कुमुदिनी रजनीकांत लाखिया, लक्ष्मीनारायण सुब्रम्हण्यम, एमटी वासुदेवन नायर (मरणोत्तर), ओसामू सुजुकी (मरणोत्तर), शारदा सिन्हा (मरणोत्तर) यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच पंत्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष, अर्थशास्त्रज्ञ विवेक देबरॉय, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी (मरणोत्तर), माजी हॉकीपटू पीआर श्रीजेश, साध्वी ऋतुंभरा, अभिनेता एस. अजितकुमार, चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
या बरोबरच महाराष्ट्रातील होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांच्यासह मारुती चितमपल्ली, चैत्राम पवार, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यास शैली होळकर, डॉ. नीरजा भाटला, भीमसिंह भावेश, थविल वादक पी. दत्चनमूर्ती, शेखा एजे अल सबा, एल हँगथिंग, भैरूसिंग चौहान, जगदीश जोशीला, सेनानी लिबिया लोबो सरदेसाई, हरविंदर सिंग यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ नीरजा भटला, भीम सिंग भावेश, पी दत्तचनमूर्ती आणि एल हंगथिंग यासह ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कर्करोग विशेषज्ञ डॉ. नीरजा, सामाजिक कार्यकर्ते भीम सिंग, पी. दत्तचनमूर्ती हे थाविल खेळाडू आहेत आणि एल. हंगथिंग हे शेतकरी आहेत.
महाराष्ट्रातील डॉ. विलास डांगरे हे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास एक लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले. ते गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करतात. तसेच मारुती चितमपल्ली हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत. तसेच चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ते वन आणि वन्यजीवाच्या संवर्धनासाठी काम करतात. तसेच गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्ययोद्धे लिबिया लोबो सरदेसाई यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
अरण्यऋषी म्हणून राज्याला परिचित असलेले मूळचे सोलापूरचे मारुती भुजंगराव चित्तमपल्ली यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध मराठी लेखक, वन्यजीव संशोधक आणि वनसंरक्षक म्हमू त्यांची ओळख आहे. वनसंपदा, वन्यजीवांचे जतन यासाठी त्यांनी ६ दशकांहून अधिक काळ योगदान दिले आहे.
पुरस्कार मिळाल्याचा आनंद
आज मला प्रचंड आनंद झाला असल्याचे मत मारुती चित्तमपल्ली यांनी व्यक्त केले. मी मराठीला नवीन एक लाख शब्द दिले आहेत. सध्या त्याच शब्दकोशावर मी काम करत असल्याचे चित्तमपल्ली म्हणाले. अपेक्षा होतीच पुरस्काराची मात्र आज पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद होत असल्याचे चित्तमपल्ली म्हणाले.