पुणे : प्रतिनिधी
देशात प्रथमच माईस्र् एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्टस्, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंदन भारतमातेला’ या कार्यक्रमात ७०० हून अधिक गायक-वादकांना एकत्रित आणून त्यांचे सादरीकरण विश्वराजबाग लोणी काळभोर केले. स्व. राज कपूर यांची जन्मशताब्दी व भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीला सांगितिक अभिवादन देणारा हा कार्यक्रम होता.
दरम्यान, पखवाजचा ताल, तबल्यावरील थाप, व्हायोलियनचा व गायकांचा सुर आणि भारत मातेला वंदन या नृत्याने उपस्थित हजारो श्रोते मंत्रमुग्ध झाले. तसेच ७०० हून अधिक गायक-वादकांच्या स्वरलहरिने सादर करण्यात आलेल्या ‘वंदन भारतमातेला’ या संगीत मानवंदनेमुळे संध्याकाळ गुलजार झाली. कार्यक्रमाची सुरूवात पं. उद्धवबापू आपेगावकर यांनी शिव, गणपती पूजा आणि तांडव नृत्यला दिल्या जार्णाया तालाने पखवाज वाद्याने सुरूवात केली.
यावेळी या प्रसंगी योगी अमरनाथ, प्रसिद्ध उद्योजक फिरोज व लिला पुनावाला, डॉ. गोयल, डॉ. बत्रा, विनोद शहा यांच्या बरोबरच एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, हभप तुळशीराम कराड, काशीराम कराड, राहुल विश्वनाथ कराड, उषा कराड, डॉ. सुचित्रा कराड नागरे, प्रा. स्वाती कराड-चाटे, ज्योती कराड-ढाकणे, पुनम नागरगोजे यांच्या सहित संपूर्ण कराड परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच प्रमाणे एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे, डॉ. संजय उपाध्ये, दूरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा, आदिनाथ मंगेशकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.मिलिंद पांडे, डॉ.मिलिंद पात्रे व डॉ. शालिनी टोणपे यांनी केले.