लातूर : प्रतिनिधी
कृषी विभागातील शेतकरी हितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ुमन सर्विस फाउंडेशन व मिडिया एक्झीबिटर्स प्रा. लि. आयोजित आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन कृषीथॉन नाशिकच्या वतीने दिला जाणारा ‘कृषीषीथॉन कृषी विस्तार पुरस्कार २०२३’ हा पुरस्कार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सूधीर तांबे, सह्याद्री फार्मर्सचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, कृषीथॉनचे संस्थापक संजय न्याहारकर यांच्या शूभहस्ते सूर्यकांत लोखंडे यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला.
तालुका कृषी अधिकारी लातूर कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक सूर्यकांत लोखंडे यांनी कृषी विभागात जलयुक्त शिवार योजनेतून २४ किलोमीटर नाला खोलीकरण काम लोकसहभागातून पूर्ण केले. मागेल त्याला शेततळे व ईतर योजनेतून ७५ शेततळे निर्माण करुन पिकासाठी संरक्षित पाणी उपलब्ध करुन दिले. पीक प्रात्यक्षिकातून ठिबकवर तूर लागवड, टोकन पद्धतीने व रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीन, करडई लागवड करुन उत्पादनात भरीव वाढ मिळविण्यामध्ये पूढाकार, सर्वाधिक बिजोत्पादन कार्यक्रम राबवून कार्यक्षेत्रातील गावे बियाणामध्ये स्वयंपूर्ण बनविली. पोकरा योजनेतून सर्वाधिक लाभ देऊन ११८ लक्ष रुपयांचे अनुदान मिळवून दिले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, फळपिक विमा योजना अंतर्गत जास्तीत जास्त शेतक-यांना लाभ मिळवून देऊन शेतक-यांचे आर्थिक राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले. या कृषी विभागातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पूरस्कार देऊन गौरविण्यात आले. पूरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.