25.7 C
Latur
Saturday, February 1, 2025
Homeमुख्य बातम्या१२ लाखापर्यंतचे पॅकेज करपात्रच; सूट मिळणार!

१२ लाखापर्यंतचे पॅकेज करपात्रच; सूट मिळणार!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने मध्यम वर्गाला मोठा दिलासा दिला. नव्या टॅक्स सिस्टिममध्ये १२ लाखापर्यंतच्या वेतनावर कुठलाही टॅक्स न लावण्याची घोषणा केली, असे असले तरी १२ लाखाच्या उत्पन्नावर टॅक्स बसणारच, फक्त त्यामध्ये सर्वसामान्य माणसाला टॅक्स रिबेट मिळणार आहे. जर, तुमची सॅलरी १२ लाखापेक्षा कमी आहे, तर कुठल्या स्लॅबवर किती टॅक्स लागणार हे जाणून घ्या. १२ लाखापेक्षा कमी सॅलरीचे किती स्लॅब आहेत ते जाणून घ्या. १२ लाखापेक्षा कमी उत्पन्नाचे तीन स्लॅब आहेत. यात पहिला शून्य ते चार लाख, दुसरा स्लॅब ४ लाख ते ८ लाख आणि तिसरा स्लॅब ८ लाख ते १२ लाखाचा आहे. आता समजून घ्या, कुठल्या स्लॅबवर किती टॅक्स बसणार.

तुमचा वर्षाचा पगार ४ लाख रुपये असेल, तर तुम्हाला एक पैशाचाही टॅक्स भरण्याची आवश्यकता नाही. तुमचे उत्पन्न ४ ते ८ लाखांच्या दरम्यान आहे, तर ५ टक्के टॅक्स कापला जाणार. तिसरा स्लॅब तुमचे उत्पन्न ८ ते १२ लाखाच्या दरम्यान आहे, तर १० टक्के टॅक्स कट होणार. तुम्ही विचार करत असाल, १२ लाखापेक्षा कमी उत्पन्नावर टॅक्स शून्य आहे. मग टॅक्स का कापला जाणार?

चार लाखाच्या पुढच्या दोन स्लॅबमध्ये जो टॅक्स लागणार, त्यात तुम्हाला रिबेट मिळणार आहे. म्हणजे, ज्यावेळी तुम्ही रिटर्न फाइल कराल, तेव्हा हे पैसे पुन्हा तुमच्या खात्यात जमा होतील. सोप्या शब्दात पैसा टॅक्सच्या रुपात कापला जाणार. पण रिटर्न फाइल करताच ते पैसे तुमच्या बँक खात्यात पुन्हा जमा होतील.

तर दंड द्यावा लागेल तो वेगळा
जर, तुम्हाला टॅक्समध्ये कापले गेलेले पैसे पुन्हा वेळेवर हवे असतील, तर त्यासाठी वेळेवर रिटर्न फाइल करावा लागेल. कारण तुम्ही रिटर्न फाइल करायला विसरलात, तर टॅक्स म्हणून कापले गेलेले पैसे परत मिळणार नाहीत. इतकेच नाही, रिटर्न फाइल न केल्याबद्दल दंड द्यावा लागणार तो वेगळा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR