28.6 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रमढी ग्रामपंचायतीच्या ठरावाविरोधात 'वंचित' आक्रमक

मढी ग्रामपंचायतीच्या ठरावाविरोधात ‘वंचित’ आक्रमक

मुस्लिमांना यात्रेत प्रवेश नाकारल्याचे पडसाद

अहिल्यानगर : प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापा-यांना बंदी घालण्याचा ठराव मढी ग्रामपंचायतीने घेतला आहे. या ठराव लवकर जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे, असे मढी ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या ठरावावरून वाद निर्माण झाला आहे. वंचित बहुजन आघाडीने या ठरावाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. हा ठराव असंविधानिक असून, याबाबत जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्याची तयारी केली आहे.
भटक्याची पंढरी म्हणून मढी यात्रा ओळखली जाते. कानिफनाथ यात्रेला होळीपासून सुरवात होते. ही यात्रा गुढीपाडव्यापर्यंत सुरू असते.

मात्र यात्रेतील मुस्लिम व्यापारी आमच्या परंपरा पाळत नाहीत. यातून भाविकांच्या भावनांना ठेच पोचते, यातून मढी ग्रामपंचायतीने मुस्लिमांना बंदी घालण्याचा ठराव घेतला आहे.

कानिफनाथ यात्रेला मोठी परंपरा आहे. महिनाभर चालणारी ही यात्रा मढी ग्रामस्थांसाठी दुखवट्याचा काळ असतो. पण, त्याचे मुस्लिम समाजाकडून पालन केले जात नाही. यावरून मढी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. मढी ग्रामपंचायतीचे सरपंच तथा कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड यांनी या ठरावाबात माहिती दिली.

कुंभ मेळाव्याच्या धर्तीवर बंदी…
यात्रेनिमित्ताने गावात आलेले मुस्लिम व्यापारी मात्र ही परंपरा पाळत नाहीत. त्यामुळे गावक-यांच्या भावनांना ठेच लागते. कुंभ मेळाव्याच्या धर्तीवर मुस्लिम व्यापा-यांना बंदीचा ठराव मढी ग्रामपंचायतीने घेतला आहे. हे लोक स्वत: कुंकू वापरत नाहीत. ते आम्हाला कुंकू विकतात. काही मुस्लिम व्यापारी दोन नंबरचे धंदे करतात. भाविकांची लूट होते. असे गावक-यांचे म्हणणे आहे.

वंचित आघाडी निषेधाची तयारी
दरम्यान, मढी ग्रामपंचयातीच्या या ठरावाविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. हा ठराव असंविधानिक आहे. असा ठराव घेणा-या मढी ग्रामपंचायतीविरोधात कारवाई व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठरावाविरोधात निषेध नोंदवण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR