24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयनिवडणूक प्रचारादरम्यान बीआरएस खासदारावर चाकूने हल्ला

निवडणूक प्रचारादरम्यान बीआरएस खासदारावर चाकूने हल्ला

हैदराबाद : भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) खासदार कोठा प्रभाकर रेड्डी यांच्यावर सोमवारी निवडणूक प्रचारादरम्यान चाकूने हल्ला करण्यात आला. खासदार कोठा प्रभाकर रेड्डी त्यावेळी सिद्धीपेठ जिल्ह्यात प्रचार करत होते. हा हल्ला झाला तेंव्हा खासदार एका पाद्रीच्या घराच्या दिशेने जात होते, मिळालेल्या माहितीनुसार, एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या जवळ आला आणि तो त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने अचानक चाकू काढून त्यांच्या पोटावर वार केला. बीआरएस कार्यकर्त्यांनी हल्लेखोराला पकडून मारहाण केली.

सिद्धीपेटचे पोलीस आयुक्त एन. श्वेता यांनी माध्यमांना सांगितले की, हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. खासदार रेड्डी यांना गजवेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासदार रेड्डी पूर्णपणे धोक्याबाहेर आहेत. रेड्डी दौलताबाद मंडलच्या सूरमपल्ली गावात प्रचारासाठी पोहोचले असताना ही घटना घडली. दरम्यान अचानक एक व्यक्ती आला आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोणताही धोका नाही, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तेलंगणा राज्यात ३० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR