23 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeनांदेडशुल्काअभावी महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या

शुल्काअभावी महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या

लोहा तालुक्यातील धनज (खुर्द) येथील घटना

मारतळा : प्रतिनिधी
महाविद्यालयीन शिक्षणाचे शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने एका १७ वर्षीय युवकाने आपल्याच शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दि. ६ मार्च रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली.

लोहा तालुक्यातील धनज (खुर्द) येथील रुपेश बळवंत ताटे (१७) हा परभणी येथे कॉलेजमध्ये ११ वीमध्ये शिकत होता. त्याने कॉलेजची फी भरण्यासाठी घरी वडिलांना पैसे मागितले होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे व वडील कर्जबाजारी असल्यामुळे वडिलांनी शुल्क भरण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तुझे आजोबाही कर्ज फेडू शकले नाहीत आणि मलाही ते शक्य नाही. वडिलांचे बोलणे ऐकल्यानंतर आपल्याला आता शिकता येणार नाही अशी भावना झाल्याने त्याने फाशी घेऊन स्वत:च जीवनयात्रा संपविली.

या घटनेची माहिती उस्माननगर पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी कापसी (बु) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. दरम्यान मयत रुपेश याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR