20.9 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeनांदेडरोहीची कारला धडक रोही गंभीर

रोहीची कारला धडक रोही गंभीर

कारच्या समोरिल भागाचे प्रचंड नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही

श्रीक्षेत्र माहूर : माहूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या श्री मंजुनाथ पेट्रोल पंपासमोरील जंगलातून अचानकपणे रोही या जंगली जनावराने चालत्या कारला प्रचंड जोराची धडक दिल्याने कारच्या समोरील काचासह वरील भागाचे प्रचंड नुकसान झाले तर रोहीच्या मानेला व पाठीला गंभीर दुखापत झाल्याने रोही आत्यअवस्थेत रस्त्यावर पडल्याची घटना पाहून नागरिकांनी वनविभागाला पाचारण केल्याची घटना दि. ६ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे.

माहूर तालुक्यातील जंगलातील पानवठे आटल्याने जंगली जनावर पाण्याचा शोधात माहूर शहरासह खेड्यापाड्यातील गाव वस्तीत फिरत असून माहूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर नगरपंचायत मालकीच्या डम्पिंग ग्राउंड कडून राष्ट्रीय महामार्गावर अचानक रोही हा जंगली जनावर आल्याने त्याची कारला जबर धडक बसली त्यामुळे गंभीर जखमी होऊन रोही खाली पडला तर कारचे प्रचंड नुकसान झाले कारमध्ये बसलेले नागरिक या धडकेत बालंबाल बचावले.

रात्री नऊ वाजता स्विफ्ट डिझायर क्र. एमएच ४० बीई ९७७३ हे धनोडावरून माहूर शहरात येत होती चालक गणेश वाडेकर रा. माहूर हा घाट चढून आल्याने वेग कमी होता पेट्रोल पंपासमोर गाडी आली असता अचानकपणे रोही येऊन समोरील भागावर आढळला त्यामुळे कारचे काच फुटले असून वरील भाग तसेच बोनट पूर्णपणे दबला तर हेडलाईट साईड ग्लासचा ही चुरा झाला धडक बसल्यानंतर रोही जमिनीवर पडला त्याच्या मानेला व पाठीला गंभीर दुखापत झाली.

सुदैवाने आतील प्रवासी बचावले वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांना घटनेची कल्पना मिळाल्याने त्यांनी वनपाल मीर साजीद आली यांचे सह कर्मचा-यांना तात्काळ घटनास्थळी पाठवून जखमी रोहिवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष दांडेगावकर यांना तात्काळ पाचरण करून वन परिक्षेत्र कार्यालयात जखमी रोहिस नेऊन उपचार केले. मरणासन्न अवस्थेत असलेल्या जखमी रोहिस वनपरिक्षेत्र कार्यालयात कर्मचारी व पशुवैद्यकीय अधिका-यांचे निगराणी खाली ठेवण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR