मानवत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आदर्श नागरिक घडविण्याचे काम केले. त्यामुळे नव राष्ट्रनिमार्णात संघाची शतकीय वाटचाल मोलाची ठरणार आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते शंकर महाजन यांनी केले.
साने गुरुजी वाचनालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत संघाची शतकीय वाटचाल या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष संजय लड्डा यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना महाजन म्हणाले, गोळवळकरांनी संघाला एकसंध ठेवून वैचारिक बैठक निर्माण करून दिली. त्यांनी संघाच्या माध्यमातून अनेक शाखा संघटनांना जन्म दिला आणि त्यांच्यामध्ये समन्वय ठेवला. परिणामी भारतभरात ५० लक्ष लोकांनी संघाच्या वेगवेगळ्या शाखा संघटनांची जबाबदारी स्वीकारली याची प्रेरणा संघाची आहे. संघाच्या या प्रवासात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह नानाजी देशमुख, ठेगडी, सुखदेवनाना नवले, प्रल्हाद अभ्यंकर, दादा लाड, मधुभाई कुलकर्णी, अशोक सिंघल, प्रवीण भाई, दामूअण्णा दाते, मिलिंद परांडे आदींच्या योगदानाची चर्चाही त्यांनी यावेळी केली.
प्रास्ताविक संजय लड्डा यांनी केले. संचालन प्रसाद जोशी यांनी तर आभार रेणकोजी दहे यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. अशोक चिंदूरवार, अशोक देशमाने, शैलेश काबरा, विलास मिटकरी, किशोर तुपसागर, डॉ. चेतन व्यास, सुनिता झाडगावकर, सूर्यकांत माळवदे, सुभाष बंडे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.