29.9 C
Latur
Monday, April 7, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात ९ एप्रिल रोजी कृषी अधिका-यांची कार्यशाळा

पुण्यात ९ एप्रिल रोजी कृषी अधिका-यांची कार्यशाळा

पुणे : प्रतिनिधी
राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी तसेच कृषी अधिका-यांना आणि कर्मचा-यांना कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्याच्या दृष्टीने राज्यातील कृषी अधिकारी-कर्मचा-यांच्या एक दिवसीय कार्यशाळेचे बुधवारी (९ एप्रिल) रोजी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे.

तांत्रिक प्रगतीमुळे शेतीचा प्रवास पारंपरिक शेतीपासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत झाला आहे.या प्रवासात कृषी विभाग आणि शेतकरी सक्षम राहिला पाहिजे या दृष्टीकोनातून कार्यशाळेचे आयोजन केले आहे.राज्यात अशा प्रकारे राज्यस्तर ते गावस्तर एकाच पातळीवर येण्याची ही किंबहुना पहिलीच वेळ आहे.

कार्यशाळेत कृषी विभाग व शेतक-यांच्या समोरील वातावरण बदलाचे परिणाम, भविष्यातील संधी व आव्हानांना सामोरे जाणे, शेतक-यांचे उत्पन्न वाढवून त्यांना सक्षम करण्यावर भर राहणार आहे.त्यादृष्टीने विविध सत्रांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. त्यामध्ये डिजिटल मार्केटिंगचा कृषी क्षेत्रातील सहभाग,कृषी उत्पादन प्रक्रियेतील संधी व आव्हाने,कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर,शेतक-याचे उत्पन्न वाढीसाठी घ्यावयाचे विविध उपक्रम आदींसारखे महत्त्वाचे विषय समाविष्ट असतील.अशी माहिती कृषी संचालक (प्रक्रिया व नियोजन) विनयकुमार आवटे यांनी सांगितली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR