37.1 C
Latur
Tuesday, April 22, 2025
Homeमहाराष्ट्रत्र्यंबकेश्वरमध्ये साधूची हत्या

त्र्यंबकेश्वरमध्ये साधूची हत्या

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणा-या त्र्यंबकेश्वर मंदिरात देशासह जगभरातून मोठ्या संख्येने भाविक भक्त येत असतात. याचदरम्यान, या त्र्यंबकेश्वरमध्ये एका साधूची हत्या करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात साधूवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोराच्या मारहाणीनंतर ५२ वर्षीय साधूचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे साधूच्या झालेल्या हत्येप्रकरणी वातावरण तापले असून आखाड्याचे महंत आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. तसेच या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाल्याने महंत संतप्त झाले आहेत. आखाडा परिषदेने पोलिसांकडे मारहाणीचे सीसीटीव्ही पुरावे सादर केले आहेत.

नशेखोरांच्या मारहाणीत संबंधित साधूचा मृत्यू झाल्याचा त्र्यंबकेश्वरमधील आखाड्यातील महंतांचा आरोप आहे. या घटनेनंतर आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरीतील दारू दुकाने बंद करण्याची मागणी साधू-महंतांकडून केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR