32.6 C
Latur
Thursday, April 24, 2025
Homeराष्ट्रीयचुकून सीमा ओलांडून पाकमध्ये पोहोचला बीएसएफ जवान

चुकून सीमा ओलांडून पाकमध्ये पोहोचला बीएसएफ जवान

फिरोजपूर : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आता सीमेवर मोठी घडना घडली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असताना सीमेवर, सीमा सुरक्षा बलाचा एक सैनिक सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला. ही घटना फिरोजपूरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर घडली. बीएसएफ जवानाने चुकून झिरो लाईन ओलांडली. यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी त्याला ताब्यात घेतले आहे.

पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर झिरो लाईनवर हा प्रकार घडला. बुधवारी चुकून पाकिस्तानात घुसलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला पाक रेंजर्सनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये झालेल्या बैठकीत बीएसएफने आपल्या सैनिकाला परत पाठवण्याची मागणी केली. पण पाक रेंजर्सनी ती नाकारली आहे. या मुद्यावरून आज पुन्हा बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबाबत घेतलेल्या निर्णयांनंतर ही धक्कादायक घडना घडल्याचे समोर आले आहे.

सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेला बीएसएफ जवान हा त्या तुकडीमध्ये आहे ती काही दिवसांपूर्वीच तिथे तैनात करण्यात आली आहे. सीमा रेषा ओळखता न आल्याने बीएसएफ जवान चुकून पाकिस्तानात गेला आहे. बीएसएफ जवान काटेरी तारेच्या पलीकडे असलेल्या नो मॅन्स लँडमध्ये पिक कापणा-या शेतक-यांवर लक्ष ठेवत होता. त्याचदरम्यान, पाक रेंजर्सनी त्याला ताब्यात घेतले. झिरो लाईनच्या खूप आधी काटेरी तार बसवली जाते. झिरो लाईनवर फक्त खांब बसवले जातात.

बीएएसएफ जवान झिरो लाईन ओलांडून पाकिस्तानच्या सीमेवर झाडाच्या सावलीत बसण्यासाठी गेला. दरम्यान, पाकिस्तानी रेंजर्सनी त्याला पाहिले. तो बीएसएफ चेकपोस्टवर पोहोचला आणि सैनिकाला ताब्यात घेतले आणि त्याचे शस्त्र जप्त केले. तथापि, बीएसएफचे अधिकारी सीमेवर पोहोचले आहेत आणि सैनिकाची सुटका करण्यासाठी सीमेवर रात्री उशिरापर्यंत बैठक सुरु घेतली.

बुधवारी सकाळी, शेतकरी कुंपणावरील गेट क्रमांक २०८/१ मधून शेतातून गहू काढण्यासाठी गेले होते. शेतक-यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत दोन बीएसएफ जवानही गेले होते. त्याचवेळी सैनिकाने चुकून सीमा ओलांडली. कडक ऊन असल्याने बीएसएफ जवान झिरो लाईन ओलांडून पाकिस्तानच्या सीमेत जाऊन एका झाडाच्या सावलीत बसला. त्याचवेळी पाकिस्तानी रेंजर्सनी त्याला पाहिले आणि त्यांनी चेकपोस्टवर पोहोचत त्याला ताब्यात घेतले आणि त्याचे शस्त्र जप्त केले. त्यानंतर लगेचच बीएसएफचे अधिकारी लगेचच सीमेवर पोहोचले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR