27.3 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे ड्रग्ज प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा

पुणे ड्रग्ज प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा

पुणे : काल पुण्यातील एफसी रोडवरील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ काल व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हॉटेलमधील वॉशरुमममध्ये टॉयलेटजवळ बसून इोन मुलं ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येत आहेत. या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या हॉटेलमध्ये हे मुल ड्रग्ज घेत होती त्या हॉटेलमालकांसह, मॅनेजर, डीजेवर देखील पुण्याच्या शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे. दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेतले असून, आज दुपारी या सात जणांना पुणे कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

सत्ताधा-यांमुळे पुणे शहर होत आहे बदनाम-जयंत पाटील

पुण्यापुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटल यांनी पोलिसांसह सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. ललित पाटील प्रकरणानंतर ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडिओ काल व्हायरल झाले. पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खब-ाांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळते, असा टोला पाटील यांनी पोलिस विभागाला लगावला आहे. तर विद्येच्या माहेरघराची ओळख आत ड्रग्ज, पब्जचे माहेरघर म्हणून होत आहे. सत्ताधारी भाजप, शिंदे सरकारमुळे पुणे शहर बदनाम होत आहे, असा आरोप ही पाटील यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR