28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडाबांगलादेशसमोर २८० धावांचे आव्हान

बांगलादेशसमोर २८० धावांचे आव्हान

चरिथ असलंकाचे शतक

नवी दिल्ली: विश्वचषकात एखादा चमत्कार होईल आणि आपल्याला उपांत्य फेरीचे तिकिट मिळेल या आशेने आज श्रीलंकेचा संघ बांगलादेशविरूद्ध मैदानात आहे. चरीथ असलंका याच्या झुंजार आणि चिवट शतकाच्या जोरावर श्रीलंकाने बांगलादेशसमोर विजयासाठी २८० धावांचे आव्हान ठेवले आहे. श्रीलंकेने ४९.३ ओव्हरमध्ये सर्वबाद २७९ धावा केल्या. श्रीलंका संघाकडून चरिथने सर्वाधिक १०८ धावांची खेळी केली.

प्रथम फलंदाजी करताना चरिथ असलंकाच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने मजबूत धावसंख्या उभारली. पथुम निसांकाने ३६ चेंडूत ४१ धावांची खेळी करून श्रीलंकेला चांगली सुरूवात करून दिली होती. त्यानंतर बांगलादेशने पुनरागमन करताना श्रीलंकेच्या कुसल परेरा (४) आणि कुसल मेंडिस (१९) यांना स्वस्तात माघारी पाठवले. त्यानंतर सदीरा समरविक्रमाने (४१) धावांची सावध खेळी करून लंकेचा डाव पुढे नेला. मग असलंकाने १०५ चेंडूत १०८ धावांची अप्रतिम खेळी करून बांगलादेशसमोर सन्मानजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. श्रीलंकेने ४९.३ षटकांत सर्वबाद २७९ धावा करून बांगलादेशला विजयासाठी २८० धावांचे लक्ष्य दिले आहे.

विश्वचषकाच्या ३८व्या सामन्यात श्रीलंकेसमोर बांगलादेशचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. बांगलादेशचा कर्णधार शाकिब-अल-हसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चरिथ असालंकाच्या शानदार शतकाच्या जोरावर बांगलादेशसमोर विजयासाठी २८० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेने २७९ धावा केल्या.

विश्वचषक जसजसा अंतिम टप्प्यात येत आहे तसतशी उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी संघांमध्ये अधिक चढाओढ लागली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ अगोदरच उपांत्य फेरीत पोहचले आहेत तसेच, ऑस्ट्रेलिया देखील जवळपास उपांत्य फेरीत पोहचल्यात जमा आहे. दुसरीकडे मात्र, चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात स्पर्धा सुरु आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR