पंढरीत फटाक्याची ठिणगी पडली आणि स्विफ्ट कार पेटली

पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील इसबावी परिसरामध्ये असलेल्या श्रीनाथ पॅलेस मंगल कार्यालय मध्ये अक्षदा पडल्या ढोल वाजले आणि विवाहाच्या उत्साहामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. परंतु याच फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये फटाक्याची ठिणगी स्विफ्ट डिझायर वाहनावर पडल्याने बघता बघता संपूर्ण गाडी ने पेट घेतला. वाहन आगीच्या भक्षस्थानी असल्याचे दिसून आले. लग्न समारंभाला आलेल्या नातेवाईक पाहुण्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी जुना अकलूज रोड येथील श्रीनाथ पॅलेस या मंगल कार्यालयात भोसले शिंदे यांचा विवाहासाठी लगबग सुरू होती. त्या ठिकाणी नातेवाईक व पै पाहुण्यांची मोठी गर्दी होती. लग्नाची घटिका समीप आली, लग्न लागले अक्षदा पडल्या वाजंत्रीचा आवाज घुमला आणि विवाहाच्या उत्साहामध्ये फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. याच फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये फटाक्याची ठिणगी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक एम एच १३/बी एन ६५०५ या पांढ-या रंगाच्या गाडीवर पडल्याने सदर वाहनाने पेट घेतले. त्या ठिकाणी सुकलेल्या गवताच्या झाडांवर ही आगीची ठिणगी पडल्यामुळे तेथेही आग लागली परंतु प्रसंगावधान राखत तरुणांनी पुढाकार घेत पिण्यासाठी ठेवलेले पाण्याचे
जार घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.

अखेर अग्निशामक दलाच्या वाहनाला बोलवण्यात आले वेळेवर वाहन आल्यामुळे स्विफ्ट डिझायर कार तसेच परिसरात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले स्विफ्ट डिझायरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असले तरीही या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. सदरची स्विफ्ट डिझायर हे वाहन गादेगाव येथील विजय बागल यांचे असल्याचे समजते.

आनंदाचे क्षण ओसंडणारा उत्साहात सावधानता बाळगावी
विवाह कार्य म्हटले की आनंदाचे क्षण आणि ओसंडणारा उत्साह सर्वांमध्ये दिसून येतो परंतु या उत्साहामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची सावधानता बाळगणे तितकेच महत्त्वाचे असते. आनंदात उडवली जाणारी फटाक्यांची आतिषबाजीत विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. लग्न समारंभासाठी आलेली वाहने मोकळे रान रस्त्याच्या कडेला सुकलेली झुडपे याचा विचार करणे ही गरजेचे आहे हे या घटनेवरून दिसून येते तरी प्रत्येकाने या सर्व गोष्टी सावधगिरीने हाताळणे गरजेचे आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news