मुंबई : चार वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवली पूर्व समता नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणा-या एका ४ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.नराधमाने शाळेतच चिमुकलीवर अत्याचार केला.
चार वर्षीय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शाळेतील कर्मचा-याने मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.