28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रतीन वाहनांचा विचित्र अपघात; २ ठार

तीन वाहनांचा विचित्र अपघात; २ ठार

जुन्नर : जुन्नर गावच्या हद्दीत नगर-कल्याण महामार्गावर कोळमाथा येथे एस.टी.बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरूण जागीच ठार झाले.तर एस टी बस मागील पिकअप पलटी झाला. हा अपघात शुक्रवारी ११ वाजे दरम्यान झाला.

दुचाकीवरील ऋषीकेश संदीप वायकर वय.२२ रा.येंधे हिवरे ता.जुन्नर,पुणे व ओंकार दत्तात्रय गाडेकर वय.२३ रा.घारगाव ता.संगमनेर,जि.अहमदनगर हे दोघे तरूण ठार झाले आहेत.
ठाणे – मेहकर ही एसटी बस भरधाव वेगात ओतूर कडून आळेफाट्या कडे जात होती.त्याच वेळी आळेफाट्या कडून ओतूर कडे दुचाकी येत होती.

कोळमाथा येथे एस टी बस ची व दुचाकीची धडक झाली यात दुचाकीवरील दोन्ही तरूण गंभीर जखमी झाले होते. स्थानिक नागरीकांनी व पोलीसांनी उपचारासाठी आळेफाटा येथे पाठवले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव बांबळे,राजेंद्र बनकर,संतोष भोसले यांनी व इतर कर्मचा-यांच्या पथकांनी महामार्गावरील अपघातग्रस्त गाड्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.तसेच सर्व अपघाता ग्रस्त गाड्या पोलीस ठाण्याच्या आवारात नेण्यात आल्याने वाहतूक कोंडी सुटली.पुढिल तपास ओतूर पोलीस करीत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR