27.3 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeमहाराष्ट्रविविध राज्यातून गुरे चोरणारी टोळी पकडली

विविध राज्यातून गुरे चोरणारी टोळी पकडली

पोलिसांच्या कारवाईत ५ अटकेत ११ म्हशींसह, १६ लाखांचा ऐवज जप्त

जळगाव : निंभोरा (ता. रावेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात पाच म्हशी चोरीला गेल्या होत्या. या गुन्ह्याचा तपास करीत असताना, निंभोरा पोलिसांच्या हाती चक्क आंतराज्यीय गुरे चोरणारी टोळी हाती लागली असून त्यांच्याकडून ११ जनावरांसह २ बोलेरो, २ दुचाकी, असा १६ लाखांचा ऐवज ताब्यात घेतला आहे.

२४ एप्रिल आणि १० जूनला म्हशी चोरीला गेल्या होत्या. सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे, ज्ञानेश्वर चौधरी, अविनाश पाटील यांनी तीन महिन्यात तब्बल ६० साठ ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचे संकलन करून संशयितांची छायाचित्रे मिळविली. सहाय्यक निरीक्षक बोचरे यांनी फैजपूरचे निरीक्षक नीलेश वाघ आणि पोलिसांच्या मदतीने संशयित तुकाराम रुमालसिंग बारेला (रा.मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याने चौकशीत टोळीचे नावे सांगितली. त्यावरून पोलिसांनी मध्य प्रदेशातून तुकाराम बारेला याचे साथीदार धर्मेंद्रसिंह दुरसिंह बारेला (रा. ढेरिया खंडवा), शांताराम बिल्लरसिंह बारेला (रा. हिवरा, ब-हाणपूर), सुभाष प्रताप ंिनगवाल (रा. दहिनाला), मस्तरीराम काशिराम बारेला (न्हावी, ता. रावेर) अशा सहा संशयीतांना अटक केली.

धर्मेंद्रसिंह याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असून मध्य प्रदेशातील ४ जिल्ह्यातून त्याला हद्दपार केले आहे. या टोळीने सिल्लोड, बुलढाणा, मुक्ताईनगर, फैजपूर, रावेर यांसह मध्य प्रदेशातून जनावरे चोरी करून कत्तलीसाठी विक्री केल्याची माहिती उघडकीस आल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR