34.9 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्ररांजे येथील रंगाच्या कंपनीला भीषण आग

रांजे येथील रंगाच्या कंपनीला भीषण आग

खेड : शिवापूर ते कोंढणपूर यादरम्यान असलेल्या रांजे (ता. भोर) येथील टप कोट या रंगाच्या कंपनीला बुधवारी (दि. २७) आग लागली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी समजते आहे. त्याचप्रमाणे सभोवताली असलेल्या कंपन्या देखील या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. रांजे (ता. भोर) ग्रामपंचायतीच्या हद्दीत टप कोट नावाची रंग तयार करण्याची कंपनी आहे.

त्या कंपनीला बुधवारी साधारण साडेदहाच्या सुमारास आग लागली. रंगाची कंपनी असल्यामुळे केमिकल व इतर ज्वलनशील पदार्थ कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात होते.
त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले, त्याचप्रमाणे या आगीमुळे त्याच्या शेजारील असलेल्या कंपनींना देखील आग लागली आहे. घटनास्थळावर ग्रामसेवक भूषण पुरोहित यांच्यासह राजगड पोलिस दाखल झाले असून अजूनही आगीचे बंब दाखल झाले नसल्याने आगीने शेजारील दोन कंपन्या आपल्या कवेत घेतल्या आहेत.

याबाबत भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लागतील तेवढे पाण्याचे बंब त्वरित पाठवण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहेत. कंपनीच्या शेजारी असलेल्या चितळे बंधू कंपनीच्या इंद्रनील चितळे यांनी सांगितले की, मी स्वत: फायर ब्रिगेडशी संपर्क साधला आहे. त्याचप्रमाणे आम्हीही जे काही सहकार्य असेल ते करू.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR