29.3 C
Latur
Sunday, April 21, 2024
Homeमहाराष्ट्रछत्तीसगडमध्ये मोठी कारवाई; चकमकीत ६ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई; चकमकीत ६ नक्षलवादी ठार

बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा जवानांनी मोठी कारवाई केली. येथील चिकुरबत्ती-पुसबाकाजवळील जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका महिला केडरसह सहा नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती एका पोलिस अधिका-यांनी दिली. या कारवाईत डीआरजी, सीआरपीएफ २२९ आणि कोब्राच्या पथकांचा सहभाग होता.

सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना बासागुडा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत चिकुरबत्ती आणि पुसबाका गावांच्या जंगलात गोळीबार सुरू झाला, असे पोलिस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी. यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि त्याची विशेष बटालियन कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट अ‍ॅक्शन) यांच्याशी संबंधित सुरक्षा जवान या कारवाईत सहभागी झाले होते, असे ते म्हणाले.
ही चकमक थांबल्यानंतर घटनास्थळावर एका महिलेसह सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. या भागात अद्याप शोधमोहीम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
बिजापूर जिल्ह्यातील बस्तर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. त्यापूर्वी सुरक्षा दलांनी नक्षल्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR