28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरअल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार

अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला असून, १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी शेतात नेऊन अत्याचार केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एक गावात ही घटना समोर आली आहे. या घटनने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज पैठण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. संजय मच्छिद्र मोहिते आणि विलास विनायक मुळे असे आरोपींचे नावं आहे.

याप्रकरणी पिडीत मुलीने पैठण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, ती नववीच्या वर्गात शिक्षण घेते. दरम्यान, गावातील संजय मच्छिंद्र मोहिते व विलास विनायक मुळे हे पिडीत मुलीच्या घराच्या पाठीमागे राहतात. तर, मागील काही दिवसांपासून दोघेही पिडीत मुलीच्या घरासमोरून जातांना तिच्याकडे पाहून सारखे हसायचे.

तर, दिवाळी सणापूर्वी एके दिवशी दुपारच्या सुमारास संजु मोहिते हा मुलीच्या घराच्या पाठीमागे आला. तसेच मुलीला घेऊन पत्राचे झोपडीमध्ये घेवुन गेला. त्यानंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच याबाबत कोणालाही काहीही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR