22.6 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रबुलडाण्यात अल्पवयीन मुलाकडून अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

बुलडाण्यात अल्पवयीन मुलाकडून अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

बुलडाणा : बुलडाण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील तरवाडी गावात अतिशय संतापजनक घटना घडली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवत अडीच वर्षाच्या चिमुकलीवर १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

अल्पवयीन मुलाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सुरुवातीला बुलडाणा सामान्य रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारांसाठी तिला अकोला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा चिमुकलीच्या शेजारी राहतो. या चिमुकलीला हा शेजारी खेळवत असे. काल काही वेळ ती घरी न दिसल्याने घरातील सदस्यांनी तिचा शोध घेतला, त्यावेळी ही चिमुकली आरोपीसोबत गेल्याची माहिती मिळाली, तेव्हा शोध घेतला असता तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याचे दिसून आले. तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती गंभीर आहे. काल पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी रात्री अकोला रुग्णालयात पीडित मुलीची भेट घेतली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR