27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयचीनमध्ये श्वसनासंबंधित नवा धोकादायक आजार

चीनमध्ये श्वसनासंबंधित नवा धोकादायक आजार

नवी दिल्ली : चीनमधील श्वसनाचा वाढत्या आजाराच्या पार्श्वभुमीवर भारत सरकार अलर्टवर आहे. केंद्र सरकारकडून आरोग्य व्यवस्था, मनुष्यबळ, प्रयोगशाळा इत्यादी आरोग्यविषयक गोष्टींची पूर्वतयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चीनमध्ये श्वसनासंबंधित नवा धोकादायक आजार बळावताना दिसत आहे. या नव्या व्हायरसने लहान मुलांना विळखा घातला आहे. चीनमध्ये मुलांमध्ये श्वसनाचा अज्ञात आजार आणि न्यूमोनिया पसरण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबत जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. आता अमेरिकन सरकारही चीनविरोधात मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चीनमधील श्वसनाचा गंभीर आजार आणि न्यूमोनियाची वाढत्या प्रकरणांच्य पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या पाच खासदारांनी चीनमधील प्रवासी बंदी घालण्याची मागणी केली आहे.

रिपब्लिकन पक्षाचे खासदार मार्को रुबियो यांच्या नेतृत्वाखाली पाच खासदारांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पत्र लिहित चीनमधील प्रवासावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. चीनमुळे कोरोना महामारी पसरल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आणखी एका गंभीर आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी चीनच्या प्रवासावर बंदी घालण्याची मागणी या अमेरिकन खासदारांनी केली आहे.

अमेरिकन खासदारांनी राष्ट्राध्यक्षांना लिहिले पत्र
अमेरिकन खासदारांनी पत्रात चीनमधील नवीन आजाराच्या धोक्यांविषयी अधिक माहिती मिळेपर्यंत अमेरिका आणि चीनदरम्यानच्या प्रवासावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. चीनच्या मुलांमध्ये पसरणा-या या नवीन रहस्यमय आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त करत चीनला अधिक माहिती शेअर करण्याचे आवाहन केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, चीनमध्ये सध्या पसरत असलेला रहस्यमय नवा व्हायरल कोरोना महामारीच्या तितका वेगाने संसर्ग होणारा नाही. संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये कोणताही नवीन विषाणू किंवा जीवाणू आढळलेला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR