वलांडी : उदगीर तालुक्यातील उदगीर बिदर रोडवर मोघा शिवारातील रायडर क्लब मोघा येथे धाड टाकुन आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई व एकुण २ कोटी १३ लाख ७५ हजार २३० रूपयांचा मूद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस प्रशासनाच्या वतिने मिळालेली अधिक माहिती अशी की,८ ऑक्टोबर रोजी पोलीस प्रशासनाला गूपीत माहीती मिळाली त्याप्रमाणे वेळ न करता उदगीर बिदर रोड रायडर क्लब येथे नमूद वेळी व ठिकाणी जिल्हाधिकारी लातूर यांनी घालून दिलेल्या परवान्यातील नियम व अटीचे उलंघन करून स्वतःचा आर्थिक फायद्यासाठी वेळेची मर्यादा ओलांडून नियमांचा भंग करून तिरट जूगार पैशावर खेळत व खेळवित असताना ५० अरोपी मिळून आल्याने जिल्हाधिकारी यांच्या व लोकसेवकांने जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा केली म्हणून धाड टाकून मिळालेली रोख रक्कम ३ लाख ३५ हजार ७५० रूपये व सोबतच अरोपींचे मोबाईल अंदाजे किंमत ४ लाख ३९ हजार ५००रूपये व सोबत वापरलेली चारचाकी वाहने अंदाजे किंमत २ कोटी ६ लाख रूपये असे एकुण २ कोटी १३ लाख ७५ हजार २३० रूपये मूद्देमाल जप्त करण्यात आला.
दि १० ऑक्टोबर रोजी ५ :५० वाजता विष्णू गोपीनाथराव गूंडरे पोह संलग्न उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर यांच्या फिर्यादीवरून ५० व्यक्ती विरोधात गूरनं ३६०/२४ कलम २२३,११२ बीएनएस १२(अ) ४.५ महाराष्ट्र जूगार प्रतिबंधक अधिनियम नूसार गून्हा नोंद करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पूढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गौंड हे करीत आहेत.