25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रगडचिरोलीत धावत्या बसने घेतला पेट

गडचिरोलीत धावत्या बसने घेतला पेट

गडचिरोली : चामोर्शी तालुक्याच्या घोट जवळील निकतवाडा गावापासून २ किमी अंतरावर धावत्या बसने पेट घेतला. ही घटना शुक्रवार १ मार्च रोजी सकाळी ६ वाजता मुलचेरा ते घोट दरम्यानच्या जंगलात घडली. चालक-वाहकाच्या प्रसंगावधानतेने बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर उतरवण्यात आले.

गडचिरोली आगाराची एम.एच. ०७ सी ९३१६ क्रमांकाची बस मुलचेरा येथे गुरूवारी मुक्कामी होती. ती बस शुक्रवारी सकाळी ६ वाजता मुलचेरावरून घोट-चामोर्शी-भाडभिडीमार्गे गडचिरोलीकडे निघाली. घोटपासून ३ किलोमीटर अंतरावरील जंगलात बसने अचानक पेट घेतल्याने चालक व वाहकांनी प्रवाशांना सूचना दिली. त्यानंतर बसमधील सर्व ८ प्रवासी उतरले. चालक प्रदीप मडावी व वाहक लोकेश भांडेकर यांनी चौकशी केली असता बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे दिसून आले. दरम्यान चालक आणि वाहकाने झाडांच्या फांद्या हातात घेऊन आग विझवली. गडचिरोली आणि अहेरी या दोन आगारात नवीन बसेस उपलब्ध झाल्या नाहीत. जुन्याच बसेसवर जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीचा गाडा रेटला जात आहे. त्यामुळे अनेकदा बसेस रस्त्यातच बंद पडणे, बिघाड येणे, पेट घेणे यासारख्या घटना घडत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR