32.4 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeसोलापूरचिमुरड्याच्या खुनाचा उलगडा होईना

चिमुरड्याच्या खुनाचा उलगडा होईना

कुर्डुवाडी : कव्हे-महादेववाडी रोडवरील भीमा- सीना बोगद्यानजीक पालखी मार्गावर चोपडे कुटुंबीयांत पोटच्या सहा वर्षीय चिमुरड्याचा कुन्हाडीने खून करून स्वतः विषारी औषध प्राशन करणारी माता घटनेच्या चार दिवसांनंतरही शुद्धीवर आलेली नाही. त्यामुळे चिमुरड्याचा खून कशासाठी झाला ? याचे कारण उलगडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. प्रणव गणेश चोपडे (वय ६, रा. कव्हे, ता. माढा) असे खून झालेल्या दुर्दैवी चिमुरड्याचे नाव असून ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊ ते सव्वा बाराच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत चिमुरड्याचे आजोबा नारायण चोपडे (वय ५७, रा. कव्हे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलाची आई कौशल्या गणेश चोपडे हिच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, तीनेही घटना घडल्यानंतर तणनाशकावराचे विषारी औषध प्राशन केल्याने बेशुद्ध अवस्थेत कुडूवाडीतील एका खाजगी दवाखान्यात अद्याप तिच्यावर उपचार सुरू असल्याने खुनामागच्या कारणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. कुटुंबातील इतर सदस्यांचे जाबजबाब पोलिसांनी नोंदवून घेतले असून वेगवेगळ्या दिशेने तपास चालू आहे.

या दुर्देवी घटनेत अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले आहेत. ही घटना भांडणातून तरी घडली नसावी ? इतर दुसऱ्यानेच कोणी बाळाला मारून, मातेलाही विषारी औषध तर पाजले नसावे, असे अनेक प्रश्न पोलिसांपुढे उभे राहिले आहेत. यामुळे या प्रकरणाशी निगडित असलेले मोबाइल क्रमांक सायबरद्वारे तपासले जात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR