22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रकोट्यवधीच्या गाडीत १७ रुपयांची साडी

कोट्यवधीच्या गाडीत १७ रुपयांची साडी

- बच्चू कडूंचे राणांवर टीकास्त्र

अमरावती : प्रतिनिधी
राणा दाम्पत्याने मेळघाटमध्ये आदिवासी महिलांना साड्या वाटल्या होत्या. त्यावरून आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली आहे. २ कोटींच्या गाडीत फिरायचे आणि १७ रुपयाची साडी गरीबांना वाटायची. आदिवासी महिलांनी नवनीत राणांनी दिलेल्या साड्यांची होळी केली होती. निकृष्ट दर्जाच्या साड्य वाटल्याचा आरोप त्यांनी केला होता. या साडीवाटपावरून मेळघाटमध्ये वातावरण चांगलेच तापले होते त्यावरून आता बच्चू कडूंनी त्यांचा समाचार घेतला आहे.

अमरावतीत लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापल्याचे दिसत आहे. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली आहे. १७ रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जती केली, असे त्यांनी म्हटले आहे.

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रहारने शिवसैनिक दिनेश बूब यांना उमेदवारी देत या ठिकाणी तिरंगी लढत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रहारचा भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधातील संघर्ष टोकाला जात आहे.

भाजपअंतर्गत नवनीत राणांबद्दल तीव्र नापसंती आहे. आता नवनीत राणा यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. बच्चू कडूंनी दोन लाखांच्या मतांनी पराभूत करू, वेळप्रसंगी नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त करू, असा इशारा देखील दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR