28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रदुप्पट पैशांचे आमिष दाखवत घातला ७० लाखांचा गंडा

दुप्पट पैशांचे आमिष दाखवत घातला ७० लाखांचा गंडा

बीड : सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. अज्ञात भामटे लोकांना फसवत आहेत. पण बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तेथे एका भाच्यानेच त्याच्या मामाची फसवणूक करून तब्बल ७० लाखांचा गंडा घातला. यामुळे एकच खळबळ माजली आहे. शेअर मार्केटमध्ये दामदुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून भाच्याने आपल्या मामाकडून सत्तर लाख रुपये उकळले. हा प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे.

मामाची फसवणूक करून त्याच पैशावर भाच्याने गोव्यात मौज मजा केली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर बीड सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच याप्रकरणी तिघांना अटकही केली आहे. सय्यद तलहा सय्यद जमाल, यश गायकवाड यांच्यासह आणखी एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील व्यापारी शेख इसाक शेख महमूद यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे.

तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, मी तुम्हाला ती रक्कम दुप्पट करून दाखवतो, असे आमिष तलहा सय्यद याने दाखवले. दुप्पट पैशांच्या मोहापायी शेख इसाक शेख महमूद यांनी तलहा सय्यद याच्यावर विश्वास ठेवला. मात्र आरोपींनी याच पैशांचा गैरवापर केला आणि गर्लफ्रेंडसह गोव्याला जाऊन त्याच पैशांवर मौज-मजा केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR