33.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरदीड लाख लोकसंख्येच्या भागात शोध मोहीम

दीड लाख लोकसंख्येच्या भागात शोध मोहीम

लातूर : प्रतिनिधी
समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्­ण व क्षयरुग्­ण शोधुन काढण्­यासाठी दि. २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत संपूर्ण राज्­यात विशेष मोहीम राबविण्­यात येत आहे. राज्­यातील १०० ग्रामीण भागात व शहरी भागातील झोपडपट्टी तसेच जोखीमग्रस्­त लोकसंख्­या असणा-या निवडक भागात ही शोध मोहीत राबविण्­यात येणार आहे. या अंतर्गत लातूर शहरातील निवडक विविध भागातील २८ हजार घरांना भेटी देवून १ लाख ५० हजार लोकसंख्­येच्­या भागात ही शोध मोहीम राबविण्­यात येणार आहे.

या शोध मोहिमेसाठी शहरात एकूण ७२ टीम गठीत करण्­यात आल्­या आहेत. प्रत्­येक टीममध्­ये एक आशा स्­वंयसेविका व एक पूरुष स्­वंयसेवकाची नियुक्­ती करण्­यात आली आहे. मोहीमेच्­या पर्यवेक्षणासाठी १५ पर्यवेक्षक नियुक्­त करण्­यात आले असुन मनपाच्­या ८ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली सदरील शोध मोहीम त्­या-त्­या भागात राबविण्­यात येणार आहे. पुरुष स्­वंयसेवक म्­हणुन न्यू व्हिजन नर्सिंग स्कूल, सोनी नर्सिंग स्कूल, वेदांत नर्सिंग स्कूल, जवळगे नर्सिंग स्कूल, स्वामी विवेकानंद नर्सिंग स्कूल या नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी नियुक्­त करण्­यात आलेले आहेत. या मोहीमेमध्­ये घरावर मार्कींग देखील केले जाणार आहे. दि. २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत ‘कुष्ठरुग्­ण शोध व सक्रीय क्षयरुग्­ण शोध ’ मोहीमेअंतर्गत घरी येणा-या मनपाच्­या आरोग्­य पथकास आवश्­यक माहिती देवून शारिरीक तपासणी करुन घ्­यावी व सहकार्य करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्­यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR