विष्णुपुरी उड्डाणपुलाच्या संरक्षण भिंतीचा भाग पुन्हा कोसळला!

नांदेड : प्रतिनिधी
नांदेड-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी येथील उड्डाणपुलाच्या संरक्षण भिंतीचा काही भाग पुन्हा एकदा कोसळल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुलाखालील मार्ग तातडीने बंद करण्यात आला असून परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, कोणताही पाऊस अथवा नैसर्गिक आपत्ती नसताना संरक्षण भिंतीचा भाग कोसळल्याने उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या उड्डाणपुलाचा काही भाग यापूवीर्ही कोसळला होता. त्या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यासह राज्यभरात मोठी चर्चा झाली होती. त्यावेळी संबंधित घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी आश्वासने देण्यात आली होती. तसेच तज्ञांची एक टीम घटनास्थळाची पाहणी करून गेली होती. मात्र काही दिवसांतच त्याच उड्डाणपुलावरील संरक्षण भिंतीचा भाग पुन्हा कोसळल्याने नागरिकांसह वाहनचालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

यापूर्वी उड्डाणपुलाचा भाग कोसळल्यानंतर खा. अशोक चव्हाण यांनी चौकशी अहवाल आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. तर पालकमंत्री अतुल सावे यांनी घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही पुन्हा त्याच उड्डाणपुलावरील संरक्षण भिंत कोसळल्याने चौकशीचे निष्कर्ष काय झाले, दोषींवर कोणती कारवाई झाली आणि दुरुस्तीचे काम कोणत्या दर्जाचे करण्यात आले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news