वॉशिंग्टन : सध्या अमेरिकेत उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. येथील अनेक भागात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. ऐन उन्हाळ्यात वॉशिंग्टन डीसीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा सहा फूट उंच मेणाचा पुतळा वितळला आहे.त्यामुळे लिंकन यांच्या पुतळ्याचा आकार पूर्णपणे खराब झाला आहे.
सुत्रांच्या मते, वॉशिंग्टन डीसी येथील प्राथमिक शाळेबाहेर अब्राहम लिंकनचा मेणाचा पुतळा बसवण्यात आला होता. उष्णतेमुळे लिंकनच्या पुतळ्याचे डोके वितळले आणि धडापासून वेगळे झाले आहे. अब्राहम लिंकनच्या वितळलेल्या पुतळ्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.