18 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपुतिन यांचे कट्टर विरोधक तुरुंगातून बेपत्ता

पुतिन यांचे कट्टर विरोधक तुरुंगातून बेपत्ता

मॉस्को : रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे राजकीय विरोधत अ‍ॅलेक्सी नवलनी हे तब्बल एक आठवड्यापासू बेपत्ता झाले आहेत. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे राजकीय विरोधत अ‍ॅलेक्सी नवलनी हे तब्बल एक आठवड्यापासून बेपत्ता झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवलनी यांच्या वकिलांचे एक आठवड्यापासून त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. इतकेच नाही तर कैद्यांच्या यादीमधून देखील त्यांचे नाव गायब झाले आहे.

मॉस्कोच्या पूर्वेला एका जेलमध्ये नवलनी यांना कैद करण्यात आले होते, त्यांना या वर्षीच तब्बल १९ वर्षांची कैद सुनावण्यात आली होती. नवलनी हे सोमवारी व्हीडीओ कॉफरन्सींगच्या माध्यमातून कोर्टात हजर केले जाणार होते, मात्र जेलकडून त्यांना सादर करण्यात आले नाही. यावर लाइट नसल्याने नवलानी यांना हजर करता आले नाही असे कारण जेल प्रशासनाने दिले. अ‍ॅलेक्सी नवलनी यांच्या प्रवक्ता कीरा यर्मिश यांनी सोमवारी सांगितले की, नवलनी सहा दिवसांपासून गायब आहेत. पुन्हा-पुन्हा प्रयत्न करून देखील त्यांचे वकील त्यांना भेटू शकत नाही आहेत. त्यांना नवलनी जेलमध्ये नसल्याचे सांगितले जात आहे. यÞार्मिश यांनी वकिलांना सांगितले की दिलेल्या माहितीनुसार नवलनी कैद्यांच्या सुचीमध्ये देखील नाही आहेत. अधिका-यांनी त्यांना कुठे स्थानांतरित करण्यात आले आहे. याबद्दल कुठलीही माहिती दिली नाही.

जेलमध्ये असलेले विरोधीपक्ष नेता खूपच खराब आहे. त्यांचे जवळचे सहकारी आणि नवलनी यांच्या अँटी करप्शन फाउंडेशन बोर्डचे अध्यक्ष मारिया पेवचिख यांनी सांगितले की, त्यांना मागच्या आठवड्यात त्यांना आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवल्या होत्या, नवलनी यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना सगळ्यापासून वेगळे ठेवण्यात आले आहे. त्यांच्या वकिलांना देखील भेटू दिले जात नसून वाट पाहण्यास सांगितले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR