नवी दिल्ली : अल्पवयीन विद्यार्थिनीला एका शिक्षकाने जबरदस्तीने फूल दिल्याचा आरोप होता. याप्रकरणी सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोणत्याही शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने फूल देऊन ते स्वीकारायला लावणे हा पोक्सो अंतर्गत लैंगिक अत्याचार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
मात्र अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत केलेल्या शिक्षकाच्या कृतीसंदर्भात ठोस पुरावा नाही. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अन्य पुराव्यांचा योग्य तपास करणे आवश्यक आहे असे देखील कोर्टाने म्हटले आहे. अशा प्रकारची कृती करणे गंभीर गुन्हा आहे. परंतु ठोस पुरावे नसताना यामध्ये एका शिक्षकाची प्रतिष्ठेवर अनेक प्रश्न उचलले जात आहेत. विद्यार्थिनीच्या साक्षीमध्ये देखील न्यायालयाला विरोधाभास आढळला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्चन्यायालयाने दिलेला निर्णय बदलला आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती केवी विश्वनाथन आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठाने आरोपी शिक्षकाला दोषमुक्त केले आहे. एका अल्पवयीन मुलीचा वापर करून शिक्षकाची बदनामी करणे वापरणे चुकीचे आहे असे न्यायमूर्ती दीपाकंर दत्ता म्हणाले. सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेली साक्ष आणि साक्षीदारांनी सादर केलेले पुरावे यामध्ये साम्य आढळत नाही. याशिवाय अल्पवयीन मुलीचा शिक्षकाला बदनाम करण्यासाठी म्हणून वापर केला जात असल्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आरोपी शिक्षकाला दोषमुक्त केले आहे.
शाळेत कृती म्हणजे निसंशय पॉक्सो
शाळेसारख्या सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची कृती करणे निसंशय पॉक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा आहे. पण, कोर्टाला हेही जाणीव आहे की यामध्ये एका शिक्षकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एका अल्पवयीन मुलीला प्यादा म्हणून शिक्षकाला बदनाम करण्यासाठी वापरणे चुकीचं आहे. दुसरीकडे, एका शिक्षकाची भूमिका समाजातील मुलींना सुरक्षित ठेवण्याची आहे असे न्यायमूर्ती दीपाकंर दत्ता म्हणाले.
लैेंगिक अत्याचाराचे दुरगामी परिणाम
वरिष्ठ वकिलांनी मांडलेल्या मुद्यांशी आम्ही पर्ू्णपणे सहमत आहोत. कोणत्याही शिक्षकाकडून एका विद्यार्थीनीवर (अल्पवयीन देखील) लैंगिक अत्याचार करणे पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा आहे. कारण, याचे दुरगामी परिणाम होणारे असतात, असे न्यायमूर्ती म्हणाले. सुप्रीम कोर्ट पुढे म्हणाले की, सादर करण्यात आलेले पुरावे एकमेकांशी मेळ खात नाहीत. शिवाय अल्पवयीन मुलीचा शिक्षकाला बदनाम करण्यासाठी म्हणून वापर केला जात असल्याचीही शक्यता आहे. कारण या प्रकरणात शिक्षक आणि विद्यार्थीनीचे नातेवाईक यांच्यामध्ये पूर्वीपासूनच वाद आहे.