27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरमराठा आरक्षणाच्या मागणीवरून तरुणाची आत्महत्या

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून तरुणाची आत्महत्या

औसा : प्रतिनिधी
गोंद्री (ता.औसा) येथील शरद भोसले या ३२ वर्षीय मराठा समाजाच्या तरुणांने मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही म्हणून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता स्वत: च्या शेतात शरद वसंत भोसले (वय ३२) या तरुणांनी स्वत:च्या शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान गळफास लावून आत्महत्या करण्यापूर्वी सरकार मराठा समाजाला आरक्षण का देत नाही अशा आशयाची चिट्टी लिहून आत्महत्या केली आहे.

शरद भोसले यांच्या पश्चात पत्नी कोमल, मुलगी आश्विनी (वय ७) दुसरी मुलगी राणी (वय ५) वर्षाची असून आई -वडील व भाऊ असा परिवार आहे. दरम्यान घटनास्थळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी येवून लेखी आश्वासन द्यावे, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी तहसीलदार भरत सूर्यवंशी व पोलिस निरीक्षक सुनिल रेजितवाड हे गोंद्रीत दाखल झाले. दरम्यान प्रशासनाने मध्यस्थीनंतर शरद भोसले यांचे हासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर पार्थिव नातेवाईकांनी ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कांहीं वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आरक्षणासाठी विविध मार्गाने आंदोलन करण्यात येत असताना मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून गावोगावी राजकिय पुढा-यांची गावबंदी, साखळी उपोषण व अमरण उपोषण सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR