21.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरमराठा आरक्षणासाठी तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

केदारखेडा(जालना) : भोकरदन तालुक्यातील देऊळगाव ताड येथील शिवानी संजय हिवाळे(१८) ही युवती बारावीत ७२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. परंतु, घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च तिला पेलवत नव्हता.

या शिवाय, मराठा आरक्षण असते तर खर्च कमी लागला असता, या विचारातून तिने एका चिठ्ठीद्वारे आपल्या भावना व्यक्त करत विहिरीत उडी घेऊन जीवन यात्रा संपवली. ही घटना बुधवारी सायंकाळी देऊळगाव ताड (ता. भोकरदन) येथे घडली. शिवानीचे शिक्षण हे आतापर्यंत मामांनी केले. यापुढेही तिला खूप शिकायची इच्छा होती. तिला बी.ए.च्या प्रथम वर्षात प्रवेशही घ्यायचा होता. परंतु, हलाखीच्या परिस्थितीमुळे आणि त्यात मराठा आरक्षण नाही. या विचाराने तिने चिठ्ठी लिहून आपल्या भावना व्यक्त करत जीवन संपवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR