24.1 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeछत्रपती संभाजीनगररिल्सच्या नादात रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू

रिल्सच्या नादात रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू

खुलताबाद : खुलताबाद येथून जवळच असलेल्या धार्मिक व पर्यटनस्थळ असलेल्या सुलीभंजन येथील दत्तधाम मंदिर परिसरात रिल्स बनविताना कार दारीत कोसळून झालेल्या अपघातात युवतीला प्राण गमवावा लागला. ही थरारक घटना आज, सोमवार दि. १७ जून दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली. श्वेता दिपक सुरवसे (२३, रा. हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर ) असे मृत तरुणीचे नाव आहे.

या बाबत अधिक सविस्तर माहिती अशी की, श्नेता सुरवसे ही मित्र शिवराज संजय मुळे (२५, रा.हनुमान नगर ) याच्यासोबत आज दुपारी छत्रपती संभाजीनगर येथून कारमधून(क्रमांक एम. एच. २१, बी. एच.०९५८) सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात आली होती. येथे श्वेताने कार चालवताना असतानाचे रिल्स बनविण्यास शिवराज यास सांगितले. मात्र, रिव्हर्स गिअर पडून एक्सलेटवर दाब पडल्याने कार वेगाने मागे जात थेट डोंगरावरुन खाली दरीत कोसळली. या भीषण अपघातात श्वेताचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी खुलताबाद पोलिसांनी पंचनामा करून मुला-मुलींच्या नातेवाईकांना बोलवून घेतले आहे. वाहन चालवित येत नसताना ते बळजबरीने चालवून स्वत:च्या अथवा इतरांच्या जिवाच्या मृत्यूच्या कारणीभूत ठरण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच मंदिर परिसरातील डोंगराच्या बाजूला कठडे असते तर ही घटना घडली नसती अशीही चर्चा परिसरात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR