25.6 C
Latur
Friday, August 1, 2025
Homeराष्ट्रीयसंजय सिंग यांना 'आप' पुन्हा राज्यसभेवर पाठवणार

संजय सिंग यांना ‘आप’ पुन्हा राज्यसभेवर पाठवणार

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने (आप) सध्या तुरुंगात असलेले खासदार संजय सिंह यांना पक्षाने पुन्हा एकता राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. संजय सिंह यांना आप पुन्हा राज्यसभेवर पाठवणार आहे. तसेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय सिंह यांची स्वाक्षरी आवश्यक असून परवानगीसाठी दिल्लीच्या राऊस अ‍ॅव्हेन्यू कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यांना अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली आहे.

संजय सिंग यांना दिल्ली अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी गुरुवारी संजय सिंह यांच्या याचिकेवर हा आदेश दिला. संजय सिंह सध्या राज्यसभेचे खासदार आहेत पण त्यांचा कार्यकाळ २७ जानेवारीला संपत आहे. राज्यसभा निवडणुकीच्या रिटर्निंग ऑफिसरने २ जानेवारी रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली होती आणि त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी निश्चित करण्यात आली आहे. संजय सिंह यांच्या याचिकेत या संदर्भात तिहार कारागृहाच्या अधीक्षकांना निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती.

याशिवाय संजय सिंह यांना त्यांच्या वकिलासोबत नामांकनावर चर्चा करण्यासाठी अर्धा तास द्यावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. संजय सिंग यांना ४ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. दिल्लीचे रद्द केलेले अबकारी धोरण तयार करण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात संजय सिंह यांची भूमिका होती, असा ईडीचा आरोप आहे. काही मद्य उत्पादक कंपन्या, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांना या धोरणाचा फायदा झाला होता. असा आरोप करण्यात आला आहे. संजय सिंह यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

स्वाती मालीवाल यांना उमेदवारी
आम आदमी पक्षाने दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांना १९ जानेवारी रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. यासोबतच पक्षाने विद्यमान खासदार संजय सिंह आणि एनडी गुप्ता यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR