सोलापूर : किसान सन्मान योजनेचा हप्ता वाढवावा, शेतीशी निगडीत सर्व उपकरणांवरील जीएसटी हटवावे, यासाठी खासदार प्रणिती शिंदे या न संसदेत आक्रमक झाल्या होत्या. खासदार शिंदे यांनी संसदेत शेतक-यांच्या विविध प्रश्नांवरुन आवाज उठवला आहे. त्यावेळी शेतक-यांच्या उपयोगात येणा-या उपकरणांवरील जीएसटी टॅक्स रद्द करावा, शेतक-यांना मिळणा-या न पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील ५ रक्कम वाढवावी, अशी मागणी केली. तसेच कृषिमंत्र्यांना भेटून त्यांनी चर्चा न करुन निवेदन दिले आहे.
खासदार शिंदे म्हणाल्या, पंतप्रधान किसान सन्मान योजना अंतर्गत शेतक-यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये मिळतात. ही रक्कम शेतक-यांसाठी तुटपुंजी आहे. यामध्ये सावणाचा खर्चसुद्धा निघत नाही. त्यामुळे सन्मान निधीत वाढ करावी. तसेच शेतक-यांच्या उपकरणांवर, कीटकनाशकांवर पाच टक्क्यांपासून १८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लावण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या शेतक-याने एक लाख रुपयांची खते खरेदी केली तर त्याला १८ हजार रुपयांचा जीएसटी सरकारला द्यावा लागतो. त्यामुळे शेतक-यांना सहा हजार रुपये देऊन त्यांच्या खिशातून १८ हजार रुपये वसूल केले जातात. त्यामुळे शेतीसंबंधित कोणत्याही वस्तूंवर टॅक्स लावू नये, अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे.
लोकसभा निवडणूकीपूर्वी केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीवरुनदेखील केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकारने आंध्र प्रदेश आणि बिहारला विशेष पॅकेज देऊन महाराष्ट्रसह इतर राज्यांवर अन्याय केला असून भाजपला महाराष्ट्रातील झालेला पराभव पचनी पडला नसल्याचा टोला खा. शिंदे यांनी लगावला. काही शेतक-यांना किसान सन्मान योजनेतील पैसे केवायसी अपडेट नसल्यामुळे मिळत नाहीत, अशा शेतक-यांना किसान सन्मान योजनेचा लाभ मिळावा त्याबरोबरच पीक विमा योजनेमध्ये प्रत्येक पिकाला पीक विमा योजनेत विमा कवच देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. रक्कम देण्यास टाळाटाळ करणा-या विमा कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.