सोलापूर : (प्रतिनिधी)
सोलापूर मधील ६० टक्के खाजगी प्रसूतीगृह फोगसी अंतर्गत चालणाऱ्या लक्ष्य मान्यता कार्यक्रमात नोंदणीकृत ६० हॉस्पिटलमधील सुमारे ३५० आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. ते दरवर्षी ४ हजार गर्भवती मातांना सुरक्षित आणि आदरपूर्वक सेवा देण्यास सक्षम होतील, असं सांगण्यात आले. फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया (फोगसी) ने रविवारी, १० मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात सोलापुरातील २० प्रसुती हॉस्पिटल्सना मान्यता प्रमाणपत्रे प्रदान केली. माता आणि प्रसुतिपूर्व आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी, कॉर्पोरेशन दृष्टिकोनाच्या अंमलबजावणीमुळे संपूर्ण प्रदेशातील माता आणि नवजात बालकांना आवश्यक सेवा देणाऱ्या प्रसूती सेवा सुविधांमध्ये ६० टक्के पेक्षा जास्त नोंदणी झाली आहे.
या कार्यक्रमाला डॉ. वैशाली शिरशेट्टी, सोलापूर महानगरपालिकेच्या आरसीएचओ, डॉ.अनिरुद्ध देशपांडे, माजी सहाय्यक संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र सरकार आणि डॉ. मंजिरी कुलकर्णी, सोलापूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी आदींसह स्थानिक सरकारी प्रतिनिधी उपस्थित होते. फोगसी लीडरशिप राष्ट्रीय स्तरावर सामील झाले होते, तर सोलापूर प्रसूती व स्त्रीरोग सोसायटी अध्यक्ष डॉ. विवेक विरकर यांच्यासह शहरातील प्रॅक्टिस करणारे प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ उपस्थित होते.
आतापर्यंत, शहरात लक्ष्य-मान्यता अंतर्गत 60 हून अधिक खाजगी हॉस्पिटल्सची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी २० ने मूल्यांकन पूर्ण केले आहे. फोगसीद्वारे त्यांचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. यामुळे केवळ ३५० हून अधिक आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढले नाही तर सुमारे ४ हजार महिलांची सुरक्षित प्रसूती देखील झाली आहे.
याव्यतिरिक्त, डॉ. मिलिंद शहा यांच्या नवल मेटरनिटी अँड नर्सिंग होमचे सेंटर फॉर स्किल एक्सलन्स (उरए) म्हणून शुभारंभचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. शाह, प्रसूती सेवा सुविधांसाठी लक्ष्य-मान्यता मानकांवर गुणवत्ता सुधारणा प्रशिक्षणाचे नेतृत्व करतील. आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर प्रसूती व स्त्रीरोग सोसायटीचे स्थानिक भागधारक या संपृक्ततेच्या प्रयत्नांचे नेतृत्व करत आहेत.