पूर्व वैमनस्यातून सिडकोत युवकाचा खून; मध्यरात्री घडला थरार, पाच आरोपी ताब्यात

नांदेड: प्रतिनिधी
हडको भागातील शाहूनगर परिसरात राहणा-या एका युवकाचा पूर्व वैमनस्यातून सिडको भागात धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. गुन्हा दाखल होताच याप्रकारणी ५ संशयीतांना पोलिसांनी पकडले आहे.

मुळ बळीरामपूर येथील रहिवासी संघरत्न माधव वाघमारे वय १९ हल्ली मुक्काम शाहूनगर हडको नांदेड या युवकाचा पूर्व वैमनस्यातून ५ ते ६ जणांनी मिळून शुक्रवारी रात्री सिडको परिसरात धारधार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक चिंचोळकर व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

याप्रकरणी राजदीप दीपक तारू, प्रवीण उर्फ बबलू रावसाहेब तारू, आदर्श उर्फ अनिल संजय लोहकरे, साईनाथ उर्फ साई राजू धुमाळे ,आदेश संजय कांबळे, व महादेव आनंदा नवघरे सर्व रा. शाहूनगर हडको यांच्याविरूद्धमयताची आई पंचशीला माधव वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेतील संशयीत ५ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी शुक्रवारी पहाटेपासूनच अनेक भागात रवाना झाले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Illegal Moneylending Case | अवैध सावकारीविरोधात गुन्हा दाखल | Latur News | Ekmat Digital
01:52
Video thumbnail
Latur Railway Coach Factory | स्थानिक युवकांना रोजगार कधी? | Latur News | Ekmat Digital
03:12
Video thumbnail
माहूरजवळ भीषण अपघात | एकाचा मृत्यू, चार गंभीर जखमी | Nanded News Today
02:03
Video thumbnail
Latur|समान वेतनासाठी सेवानिवृत्त कर्मचारी आक्रम;कवेतनातील तफावत कधी मिटणार?
06:30
Video thumbnail
Nanded Sand Mafia Action | आठ बोटी ब्लास्ट करून नष्ट | LCB Raid | Nanded News
00:48
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये १४.४८ लाखांचा गुटखा जप्त | बोलेरोसह मुद्देमाल ताब्यात | Latur News
01:42
Video thumbnail
'गोविंदा' अन् 'उदो उदो'च्या जयघोषात अंबाबाईला तिरुपती देवस्थानचा मानाचा शालू अर्पण
00:56
Video thumbnail
Maharashtra Drought|५ हजारांत दुष्काळ मिटणार? शेतकऱ्यांची बोळवण? | मुद्दा महाराष्ट्राचा
47:58
Video thumbnail
Latur Traffic Police|आईच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक शाखेचे सुरक्षा कवच!
02:17
Video thumbnail
५ हजार मदत म्हणजे क्रूर थट्टा; दुष्काळग्रस्तांना १ लाख रुपयांच्या मदतीची शेतकरी संघटनांची मागणी.
10:59
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन!
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ५५ वर्षीय महिलेच्या खुनाचा उलगडा; २४ तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
02:49
Video thumbnail
DCC BANK ELECTION|पक्षीय राजकारण बाजूला! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील धिरज देशमुखांसोबत
04:38
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये मध्यरात्री कार मन्याड नदीत कोसळली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
01:37
Video thumbnail
Nanded|माहूरच्या केरोळी घाटात भीषण अपघात! टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर
01:10

Latest news