21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeक्रीडाकोकेन खरेदी प्रकरणी हॉकीपटू टॉम क्रेगवर कारवाई

कोकेन खरेदी प्रकरणी हॉकीपटू टॉम क्रेगवर कारवाई

सिडनी : ऑस्ट्रेलियन हॉकीपटू टॉम क्रेगला पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान कोकेन खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हॉकी ऑस्ट्रेलियाने १२ महिन्यांसाठी निलंबित केले आहे. टॉम क्रेगला पॅरिसमध्ये ७ ऑगस्टच्या रात्री कोकेन विकत घेण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली होती पण नंतर त्याची सुटका करण्यात आली. २९ वर्षीय ऑलिम्पियन आणि टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या ऑस्ट्रेलियन हॉकीपटू टॉम क्रेगला एका रात्रीच्या कोठडीनंतर गुन्हेगारीच्या चेतावणीसह सोडण्यात आले होते. याची पुष्टी करणारे एक निवेदन फ्रेंच वकिलांनी जारी केले आहे.

पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान अनेक विचित्र प्रकरणे समोर आली होती, मग ते डोपिंग प्रकरण असो किंवा वजन घटवण्याचे प्रकरण असो, पॅरिस ऑलिम्पिक अशाच प्रकरणांभोवती फिरले. पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूचे असेच एक प्रकरण समोर आले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियन हॉकीपटू टॉम क्रेग याला पॅरिसमध्ये कोकेन विकत घेण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली होती. या घटनेमुळे ऑस्ट्रेलियाच्या हॉकी संघाची चांगलीच बदनामी झाली होती.

टॉम क्रेग १२ महिन्यांसाठी निलंबित
दरम्यान, हॉकी ऑस्ट्रेलियाने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ दरम्यान राष्ट्रीय पुरुष हॉकी संघाचा खेळाडू टॉम क्रेग याच्या अटकेच्या चौकशीनंतर, हॉकी ऑस्ट्रेलियाच्या एथिक्स युनिटने त्याला १२ महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. सहा महिन्यांचे पूर्ण निलंबन आणि उर्वरित सहा महिने त्याच्या वर्तनावर अवलंबून असतील, असे निवेदनात म्हटले आहे. हॉकी ऑस्ट्रेलियाने सांगितले की क्रेग २०२५ च्या संघात निवडीसाठी पात्र असेल. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियन संघ सहाव्या स्थानावर राहिला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR