नांदेड,दि.३:- नांदेड शहरात वाढत जाणारी विजेची वितरण व वाणिज्यक हाणी कमी करून ग्राहकांना अधिक सुरळित व अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणने वीज चोरांविरूध्द मोहिम हाती घेतली आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये महावितरणच्या कारवाईत नांदेड शहरात ५४ वीज चोरांविरूध्द कारवाई केली असून १२ जणांविरूध्द पोलिसात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
मुख्य अभियंता राजाराम माने आणि अधिक्षक अभियंता संजय खंदारे यांच्या निदेर्शानुसार नांदेड शहरातील शहर उपविभाग १, शहर उपविभाग २, व एम आय डी सी उपविभागात वीज चोरांची शोध मोहिम राबविण्यात आली. त्यात ५४ जणांनी वीज मिटरमध्ये फेरफार करून चोरी केल्याचे आढळून आले. या चोरांनी ३२,४०२ यूनिट विजेची चोरी केली व असून त्याचे ६ लाख ९४ हजार ९७० रुपए इतके मूल्य आहे. त्यांच्या विरूध्द भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली आहे, चोरीत वापरलेल्या ३२,४०२ युनिटच्या बिलाची वसुली प्रक्रियाही सुरू आहे.
तर त्याच कायद्यानुसार मोह्मद सरवार रा. गोपाळ चावडी, मोह्मद हाजीक मोह्मद फारूक रा. मुजमपेठ, सुमन शिंदे रा. शिंदे गल्ली, सुनिल जाधव रा. धनेगाव, व्यंकट तोकलवाड रा. शंकर नगर, मोह्मद बाबू अहेमद रहेमान कुरेशी रा. महेबूब नगर, नदाफ नजूकमियाँ छोटेमियाँ रा. महेबूब नगर, रामकौर बाबुराव कांबळे दोन वीज जोडण्या रा. गोविंद नगर, हुलाजी अबाजी बोयेवार रा. गांधी नगर, दयानंद बुध्दाजी भालेराव रा. बेला नगर यांनीही मीटरमध्ये मोडमोड करून वीज चोरी केल्या प्रकरणी शहरातील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याचे नांदेड शहर विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश कलंत्री यांनी कळविले आहे.
















