मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक २०२४ ची धामधूम सर्वत्र सुरू आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे यातच आता शिवसेना (शिंदे) पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यात स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता गोविंदा, अभिनेते शरद पोंक्षेंसह मंत्री दीपक केसरकर आदींचा समावेश आहे.
दरम्यान, उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आजपासून ख-या अर्थाने प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. या प्रचारात विरोधक सत्ताधारी एकमेकांची उणीदुणी काढताना दिसणार आहेत. तर मागील एक-दोन दिवसांपासून मुंबईत जे उमेदवार उभे आहेत, त्यांनी आपली प्रचाराची कार्यालये उघडली आहेत. रविवारी उबाठा माहिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेश सावंत यांनी कार्यालयाचे खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते उद्घाटन केले.
शिवसेना स्टार प्रचारकांची यादी
एकनाथ शिंदे, रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ, प्रताप जाधव, गुलाबराव पाटील, नीलम गो-हे, मीना कांबळी, उदय सामंत, शंभुराज देसाई, दीपक केसरकर, तानाजी सावंत, दादाजी भुसे, संजय राठोड, अब्दुल सत्तार, भरत गोगावले, संजय शिरसाट, श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, नरेश म्हस्के, श्रीरंग बारणे, मिलिंद देवरा, किरण पावसकर, राहुल शेवाळे, शरद पोंक्षे, मनीषा कायंदे, गोविंदा आहुजा, कृपाल तुमाने, डॉ दीपक सावंत, आनंद जाधव, ज्योती वाघमारे, शीतल म्हात्रे, राहुल लोंढे, हेमंत पाटील, हेमंत गोडसे, डॉ. राजू वाघमारे, मीनाक्षी शिंदे, ज्योती मेहेर, अक्षय महाराज भोसले, तेजस्विनी केंद्रे.