मुुंबई : प्रतिनिधी
मलायका अरोराशी संबंधित दु:खद बातमी येत आहे. मलायकाच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला आहे. मलायका अरोराच्या वडिलांनी वांद्रे येथील घराच्या तिस-या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. या बातमीनंतर मलायका अरोरा पुण्याहून मुंबईला रवाना झाली आहे. सध्या अभिनेत्रीच्या वडिलांचा मृतदेह बाबा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
या घटनेबद्दल मिळालेली माहिती अशी आहे की, मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आज बुधवारी आयुष्य संपविले. बांद्यातल्या राहत्या घरी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेबद्दल कळताच अरबाज खान त्याच्या कुटुंबियांसह बांद्र्यातील घरी पोहोचल्याची माहिती आहे. तर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.