28.8 C
Latur
Sunday, March 3, 2024
Homeमनोरंजनपुण्यात रिसॉर्टमध्ये अभिनेत्रीवर बलात्कार

पुण्यात रिसॉर्टमध्ये अभिनेत्रीवर बलात्कार

पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात सिनेअभिनेत्रीवर रिसॉर्टमध्ये नेऊन बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विराज पाटील नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार झाल्यानंतर अभिनेत्रीच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून तिला ठार मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली आहे.

या प्रकरणी ३५ वर्षीय विराज पाटीलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी या अभिनेत्रीने तक्रार दाखल केली होती. अभिनेत्री आणि विराज यांची ओळख सोशल मीडियावर झाली होती. विराजने पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत लग्न करेन असे म्हणत अभिनेत्रीवर पुण्यातल्या मुळशी भागातील रिसॉर्टमध्ये वेळोवेळी बलात्कार केला. लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले, असे अभिनेत्रीने तक्रारीत म्हटले आहे.

२७ ऑगस्ट २०२३ पासून २० जानेवारी २०२४ या कालावधीत विमाननगर आणि मुळशी भागातील रिसॉर्टमध्ये सातत्याने बलात्कार झाल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. त्यानंतर पीडिताने फोन केल्यानंतर आरोपीने ते फोनसुद्धा उचलणे बंद केले होते. माझ्या घरच्यांना का टाळत आहेस? फोन का उचलत नाही, असा प्रश्न विराजला महिलेने विचारल्यावर त्याने शिवीगाळ केली. तसेच त्याच्याकडे असलेले पिस्तूल तरुणीच्या डोक्यावर ठेवून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही आणि तू जर पोलिसांकडे गेलीस तर तुला मी दाखवतो कोण आहे, अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR