30.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रछत्तीसगडमधील ७ मतदारसंघांत होणार तिस-या टप्प्यात मतदान

छत्तीसगडमधील ७ मतदारसंघांत होणार तिस-या टप्प्यात मतदान

रायपूर : छत्तीसगडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातील सात जागांसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये रायपूर, बिलासपूर, दुर्ग, कोरबा, रायगड, जांजगीर चंपा आणि सुरगुजा या लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून, आज संध्याकाळी ५ वाजता येथील निवडणूक प्रचार संपणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने तिस-या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण केली असून, सात जागांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

छत्तीसगडमधील सात जागांसाठी एकूण १६८ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये पुरुष उमेदवारांची संख्या १४२ तर महिला उमेदवारांची संख्या २६ आहे. लोकसभेच्या सातही जागांच्या तुलनेत रायपूर लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक ३८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर बिलासपूरमध्येही ३७ उमेदवार रिंगणात आहेत.

मतदान केंद्रावर २० हजार सैनिक तैनात

दरम्यान, राज्यातील रायपूर, बिलासपूर, दुर्ग, कोरबा, रायगड, जांजगीर चंपा आणि सुरगुजा लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी तिस-या टप्प्यात मतदान होणार आहे. या सात जागांसाठी निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली आहे. राज्यात एकूण १५ हजार ७०१ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, या मतदान केंद्रांवर सुरक्षेसाठी २० हजार २०० जवान तैनात करण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR