27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअ‍ॅड. सदावर्तेंच्या घोषणेकडे कर्मचा-यांची पाठ

अ‍ॅड. सदावर्तेंच्या घोषणेकडे कर्मचा-यांची पाठ

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरणासह सातव्या वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्ष अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी सोमवारपासून कामबंद करून संपाचा इशारा दिला होता. मात्र, अ‍ॅड .सदावर्ते दाम्पत्याच्या संपाच्या घोषणेला राज्यातील एसटी कर्मचा-यांनी पाठ फिरवल्याचे चित्र सोमवारी निर्माण झाले होते. एकही डेपोतील कर्मचारी रस्त्यावर उतरले नसून, राज्यातील एसटीची सेवा १०० टक्के सुरळीत असल्याने सदावर्ते यांच्या संपाची गोची झाली.

विलीनीकरण आणि सातवा वेतन शिस्त आवेदन पद्धती अशा विविध मागण्यांसाठी एसटी कष्टकरी जनसंघाने सोमवारपासून राज्यात कामबंद आंदोलनाची नोटीस एसटी महामंडळाला दिली होती. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीची राज्यातील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, सोमवारी एसटी सेवा सुरळीत सुरू राहिली. त्यामुळे सदावर्ते यांची घोषणा फेल ठरली.

यापूर्वीही एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी तब्बल सहा महिने सदावर्ते यांनी संप पुकारला होता. मात्र, एसटी कर्मचा-यांना यापैकी एकही मागणी पूर्ण न होता. रिकाम्या हाताने कर्मचा-यांना कामावर रुजू व्हावे लागले होते.

सदावर्ते यांच्या बंदच्या आवाहनाला कर्मचा-यांंनी अक्षरश: झिडकारले. सोमवारी १०० टक्के वाहतूक सुरु होती. आपली अवहेलना झाकण्यासाठी सदावर्तेंनी उद्योगमंत्र्यांची बैठक लावून घेऊन फक्त आश्वासनावर आंदोलन मागे घेतल्याची घोषणा त्यांना करावी लागली, असा आरोप करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR