22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूर१६ मार्च पासून वकिलांना काळया कोट परिधान करण्यापासून सवलत

१६ मार्च पासून वकिलांना काळया कोट परिधान करण्यापासून सवलत

सोलापूर – वकिलांकरिता भारतीय अधिवक्ता अधिनियम -१९६१ या मधील तरतुदींनुसार ड्रेस कोड ठरलेला आहे.तर सिव्हील मॅन्युअल मधील प्रकरण – २२ अनुच्छेद-.६३६ नुसार वकिलांना ड्रेस कोड वापरास कांहीं सवलती दिल्या आहेत त्यामुळे वकिलांना आता दि.१५ मार्च ते ३० जुन या कालावधीत काळा कोट वापरण्या पासून सुट देण्यात आली आहे.त्यामुळे आता काही दिवस वकिल काळया कोटाला सुट्टी देणार आहेत.

ऊन्हाळ्यात काळया कोटामुळे त्रास होऊ नये म्हणुन तीन महिने हया सवलतीची तरतूद आहे.काळा कोट व वकिल हे समिकरण जरी रूढ असले तरी आता तीन महिने याला विश्रांती असणार आहे. अशी माहिती सोलापूर बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड.सुरेश गायकवाड यांनी दिली.

ड्रेस कोड मुळे एक वेगळा प्रभाव समाज, पक्षकार व‌ न्याय व्यवस्था यांचेवर होत असतो . मात्र वकिलाना स्वताच्या हिताची व प्रकृती ची काळजी घेण्यासाठी या सवलतीचा लाभ घेणे अपरिहार्य मानले जाते.

समाजात प्रतिष्ठेचा गणला जात असलेल्या या वकिली व्यवसायाला अलिकडे एक वेगळे महत्त्व प्राप्त होत आहे.अपेक्षाही वाढत आहेत .सजग समाज व जलद न्यायदानासाठी वकिल महत्वाचा घटक आहे.तो टिकला पाहिजे.याकरिता काही हितकारक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR