सोनू निगम यांचा वेदनादायक परिस्थितीतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांकडून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई : प्रसिद्ध गायक सोनू निगम गेल्या आठवड्यापासून मज्जातंतूशी संबंधित एका वेदनादायक समस्येशी झुंज देत आहे आणि त्यावर वैद्यकीय उपचार घेत आहे. अनेक वैद्यकीय तपासण्या, औषधोपचार आणि फिजिओथेरपी सुरू असतानाही त्यांनी मुंबईतील नियोजित कार्यक्रम रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हीडीओमध्ये सोनू निगम यांनी सांगितले की, त्यांच्या काही नसांवर दाब आल्यामुळे त्यांना तीव्र वेदना होत आहेत. या समस्येचे नेमके स्वरूप समजून घेण्यासाठी त्यांनी गेल्या आठवडाभरात अनेक एमआरआय आणि सीटी स्कॅन तपासण्या केल्या आहेत. माझ्या नसांवर दाब आला आहे. गेल्या आठवडाभरापासून एमआरआय आणि सीटी स्कॅन करत आहे. अनेक औषधेही घेत आहे, असे त्यांनी सांगितले.

उपचार प्रक्रियेविषयी माहिती देताना सोनू म्हणाले की, फिजिओथेरपीचा अनुभव अत्यंत वेदनादायक ठरला आहे. वेदना कमी करण्यासाठी त्यांना पेनकिलर्स घ्यावे लागत आहेत. फिजिओथेरपी खूपच वेदनादायक होती. सध्या मी वेदनाशामक औषधे घेत आहे. त्यामुळे माझा घसाही थोडा जड झाला आहे, असे त्यांनी सांगितले. स्नायूंना आराम देण्यासाठी दिल्या जाणा-या औषधांचा परिणाम त्यांच्या आवाजावरही होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

तब्येत बिघडली तरी कार्यक्रम रद्द नाही
आरोग्याच्या अडचणी मान्य करताना सोनू निगम यांनी स्पष्ट केले की, ते कोणत्याही परिस्थितीत आपला कार्यक्रम रद्द करणार नाहीत. ब-याच काळानंतर पुन्हा रंगमंचावर परफॉर्म करण्याची संधी मिळत असल्याने चाहत्यांना दिलेले वचन पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार आहे.

चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सोनू निगम यांचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. अनेकांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर काहींनी कठीण परिस्थितीतही कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि जिद्द यांचे कौतुक केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news