28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रदिवाळीनंतर ओबीसी समाज उतरणार रस्त्यावर

दिवाळीनंतर ओबीसी समाज उतरणार रस्त्यावर

मोठ्या आंदोलनाची तयारी

मुंबई : ‘‘सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये घेऊ नये. त्यामुळे ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय होणार आहे. ओबीसींच्या पावणेचारशे गरीब जमाती आहेत. आमच्या मुला-बाळांचे, लेकरांचे आरक्षण अशा प्रकारे कुणबी दाखले देऊन हडप करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात सुरु आहे. आम्ही ओबीसी नेते हे खपवून घेणार नाही. दिवाळी संपली की, राज्यभर आंदोलन सुरु करणार’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकश शेंडगे यांनी दिला

‘आम्ही भुजबळांना सांगितले, तुम्ही मंत्रिमंडळात राहून संघर्ष करा. राजीनामा देऊन बाहेर पडू नका. आम्ही बाहेर राहून संघर्ष करु’’ असे प्रकाश शेंडगे म्हणाले. ‘हा संघर्ष आमच्या हक्काच्या आरक्षणाच संरक्षण करण्यासाठी आहे. सगळे ओबीसी भटके, विमुक्त रस्त्यावर उतरुन लढा सुरु करणार आहोत. दिवाळी संपली की, राज्यभर आंदोलन सुरु करणार आहोत’ असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.

‘ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असा महाराष्ट्र सरकारने शब्द दिला होता. आधी सांगितले, निजामाच्या नोंदी शोधत आहोत. सुरुवातीला ५ हजार, ११ हजार नोंदी निघाल्या, आम्ही मान्य केल्या. आता शिंदे समितीला संपूर्ण महाराष्ट्रात नोंदी शोधण्याच काम लावले आहे. मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन मागासवर्गीय ठरवत असून हे षडयंत्र हाणून पाडणार’ असे प्रकाश शेंडगे म्हणाले.

‘सुप्रीम कोर्टाने मराठा समाज मागस नाही हे दाखवून दिले आता. आता कुणबी दाखले देऊन मागासवर्गीय होतो का? जात बदलण्याचा अधिकार कोणाला नाही. आम्ही न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय सुद्धा केला आहे. अशा प्रकारे कुठली समिती नेमून मागासवर्गीय ठरवू शकत नाही. एखाद्या समाजाला मागास ठरवण्याची प्रक्रिया असते. राज्य मागासवर्गीय आयोग आहे’ असे प्रकाश शेंडगे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR